घटना :-
१९९६ - तालिबानने
अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हा नुद्दीन रब्बानी यांनी
पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.
१९६१ - सिएरा
लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९५८ - मिहीर सेन
हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.
१९४० - दुसरे
महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी,
जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.
१९२५ - डॉ. केशव
बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
१८२१ -
मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जन्म :-
१९८१ -
लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू
१९८१ - ब्रॅन्डन
मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९६२ - गेव्हिन
लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९५३ - माता
अमृतानंदमयी
१९३२ - यश चोप्रा
– चित्रपट दिग्दर्शक,
पटकथालेखक आणि निर्माते
१९०७ - वामनराव
देशपांडे – संगीत समीक्षक
१६०१ - लुई
(तेरावा) – फ्रान्सचा राजा
मृत्यू :-
२००८ - महेन्द्र
कपूर – पार्श्वगायक
२००४ - शोभा
गुर्टू – शास्त्रीय गायिका
१९९९ - डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य
प्रकल्पाच्या संचालिका
१९९२ - अनुताई
वाघ – समाजसेविका
१९७५ - तिरुवेंकट
राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ
१९७२ - एस. आर.
रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व
ग्रंथालयशास्त्रतज्ञ
१९२९ - शिवराम
महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
१८३३ - राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक
व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी
त्यांनी आंदोलन उभारले.
No comments:
Post a Comment