नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२९ सप्टेंबर

घटना :-

२०१२ - अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००८ - लेहमन ब्रदर्सआणि वॉशिंग्टन म्युच्युअलया बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा डाऊ जोन्सनिर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.

१९९१ - हैतीमधे लष्करी उठाव

१९६३ - बिर्ला तारांगणहे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.

१९४१ - दुसरे महायुद्ध किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

१९१७ - मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कुलसुरू झाली.

१९१६ - जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.

जन्म :-

१९७८ - मोहिनी भारद्वाज अमेरिकन कसरतपटू (Gymnast)

१९५७ - ख्रिस ब्रॉड इंग्लिश क्रिकेटपटू व पंच

१९४३ - लेक वॉलेसा नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष

१९३४ - लान्स गिब्ज वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज

१९३२ - हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू

१९३२ - महमूद विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता

१९२८ - ब्रजेश मिश्रा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

१९२५ - डॉ. शरदचंद्र गोखले समाजसेवक

१९०१ - एनरिको फर्मी न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ

१८९० - ल. गो. तथा नानाशास्त्री दाते पंचांगकर्ते 

मृत्यू  :-

१९९१ - उस्ताद युनुस हुसेन खाँ आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक

१९१३ - रुडॉल्फ डिझेल डिझेल इंजिनचा संशोधक

१८३३ - फर्डिनांड (सातवा) स्पेनचा राजा
  ८५५ - लोथार (पहिला) रोमन सम्राट

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा