नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० सप्टेंबर

घटना :-

२००१ - अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).

१९७७ - व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७३ - बॅटल ऑफ सेक्सेस - ह्यूस्टन, टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरूषाचा लॉन टेनिस मधे पराभव केला.

१९१३ - वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षाया नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

१८५७ - १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

जन्म :-

१९०९ - गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

१९४९ - महेश भट्ट चित्रपट दिग्दर्शक

१९३४ - सोफिया लॉरेन हॉलीवूडमधील इटालियन अभिनेत्री

१९२५ - आनंद महिडोल तथा राम (सातवा) थायलँडचा राजा

१९२२ - द. न. गोखले चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.

१८९८ - नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळवृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. निरोप घेताहे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

१८५३ - चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) थायलँडचा राजा

मृत्यू  :-

१९९७ - कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार चित्रपट अभिनेते

१९३३ - अॅ३नी बेझंट थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी होमरुल लीगची स्थापना केली.

१९१५ - संत गुलाबराव महाराज
१८१० - मीर तकी मीर ऊर्दू शायर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा