नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२२ सप्टेंबर

घटना :-

१९९८ - क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषणहा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्चण सन्मान जाहीर

१९९५ - घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्चव न्यायालयाचा निर्णय

१९९५ - श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.

१९८२ - कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुषया नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९८० - इराकने इराण पादाक्रांत केले.

१९३१ - नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

१८८८ - द नॅशनल जिऑग्रॉफिकया मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१६६० - शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१४९९ - बेसलचा तह स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

जन्म :-

१९१५ - अनंत माने पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आईहे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अनंत आठवणीहे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

१९०९ - दत्तात्रय तुकाराम तथा दत्तूबांदेकर ऊर्फ सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक

१८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण

१८६९ - व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते

१७९१ - मायकेल फॅरेडे इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू  :-

२०११ - मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब

१९९४ - जी. एन. जोशी भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.

१९७० - शरदेंन्दू बंदोपाध्याय बंगाली लेखक

१९९१ - दुर्गा खोटे हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये मी दुर्गा खोटेहे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.

१९५६ - फ्रेडरिक सॉडी नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज
१५३९ - गुरू नानक देव शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा