नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ सप्टेंबर

घटना:

२००९ - ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्घा१टन झाले.

२००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित ’मॉन्सून वेडींग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ’गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.

१९९७ - सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्चन असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.

१९९१ - ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९९० - श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

१९८५ - मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्यां दा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.

१९४५ - दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

१९३९ - मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमामधे ’प्रभात’चा ’माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.

१८५० - कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले.

१८३९ - जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर घेतले.

१५४३ - नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.


जन्म :

१९५० - श्रीधर फडके – संगीतकार

१९४१ - अबीद अली – अष्टपैलू क्रिकेटपटू

१९०९ - लीला चिटणीस – अभिनेत्री

१९१० - नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती

१८९० - कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ चे संस्थापक

१८५० - भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक.

१८२८ - लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक


मृत्यू :

२०१२ - व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक

२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक

१९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक

१९९७ - आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष 

१९९४ - सत्यभामाबाई पंढरपूरकर – लावणीसम्राज्ञी 

१९७६ - माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते

१९६० - अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर

१४३८ - एडवर्ड – पोर्तुगालचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा