नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ सप्टेंबर

घटना :२००९ - टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

२००२ - चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्चश पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

१९९९ - साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर

१९९७ - महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.

१९६२ - बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९४८ - निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.

१९४७ - अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

१९२७ - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना

१९२४ - गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९१९ - हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्कन मिळाला.

१८८५ - कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

१८१० - चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१५०२ - आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचला.


जन्म :-

१९१२ - गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक 

१९०६ - प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी 

१९०५ - ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री 

१९०० - शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री 

१७०९ - सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत 

   

मृत्यू  :-

२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक 

२००२ - शिवाजी सावंत – साहित्यिक

१९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक  

१९९५ - प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी

१९९३ - असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक

१९९२ - मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती  आणि ११ वे सरन्यायाधीश 

१७८३ - लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा