नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१९ सप्टेंबर

घटना :२००७ - टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

२००१ - महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना ’जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर

२००० - भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.

१९८३ - सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

१९५९ - सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ’डिस्नेजलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९४६ - फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला. दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे याला ७ वर्षे ऊशीर झाला.

१८९३ - न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.


जन्म  :-

१९५८ - लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक

१९२५ - बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार

१९१७ - अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक

१९११ - विल्यम गोल्डिंग – इंग्लिश लेखक

१८६७ - शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक.


मृत्यू  :-

२००७ - दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार

२००४ - दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना

२००२ - प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.

१९९३ - दिनशा के. मेहता – निसर्गोपचार तज्ञ, महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी 

१९९२ - ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक

१९६३ - सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार

१९३६ - पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक

१८८१ - जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष

१७२६ - खंडो बल्लाळ चिटणीस – छ. संभाजी व छ. राजाराम यांचे स्वीय सहाय्यक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा