नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१७ सप्टेंबर

घटना :

२००१ - सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.

१९८८ - दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९८३ - वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.

१९५७ - मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९४८ - हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

१६३० - बॉस्टन शहराची स्थापना झाली



जन्म :-

१९५१ - डॉ. राणी बंग – समाजसेविका

१९५० - नरेन्द्र मोदी – भारताचे पंतप्रधान

१९३९ - रविंद्र सदाशिव भट – गीतकार 

१९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार 

१९३७ - सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी

१९३० - लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक 

१९२९ - अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक 

१९१५ - मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक 

१९१४ - थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक 

१९०६ - ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष 

१९०० - जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक 

१८८५ - केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते 

१८८२ - अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका 

१८७९ - पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते 



मृत्यू :-

२००२ - विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार 

१९९९ - हसरत जयपुरी – गीतकार 

१९९४ - व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू 

१९३६ - हेन्रीस लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ 

१८७७ - हेन्रीस फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा