नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ सप्टेंबर

घटना :-

२००३ - इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

१९९९ - किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

१९९५ - संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

१९७८ - ’व्हेनेरा-२’ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

१९६० - ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.

१९५९ - सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

१९४८ - दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.

१९१७ - रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

१८९३ - सरदार खाजवीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.

  ७८६ - हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.


जन्म :-

१९६३ - रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९५७ - केपलर वेसेल्स – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू

१९४८ - वीणा सहस्रबुद्धे – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका

१९३२ - डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते 

१९२३ - राम जेठमलानी – कायदेपंडीत

१९२१ - दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी

१९०१ - यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत  

१८९७ - पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक 

१८६७ - विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक 

१७१३ - योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ 


मृत्यू  :-

२०११ - हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक 

१९९८ - प्रा. राम जोशी – शिक्षणतज्ञ

१९८९ - बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक

१९७९ - नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष 

१९०१ - विल्यम मॅक किनले - अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा