नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ मार्च


घटना :-

२००२ - पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.

१९९८ - दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्नाहा सर्वोच्चह नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

१९९२ - बोस्निणया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

१९५४ - प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता. तो दिवसासुद्धा १५० किलोमीटर पेक्षा जास्त दूरवर दिसला. या स्फोटामुळे आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झाला.

१९४८ - गुवाहाटी उच्चा न्यायालयाची स्थापना

१९४७ - आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

१९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण झाले.

१९३६ - अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरणबांधून पूर्ण झाले.

१९२७ - रत्नाकगिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.

१९०७ - टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना

१८७२ - यलो स्टोन नॅशनल पार्कया जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

१८०३ - ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले.

१५६५ - रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

जन्म :-

१९८० - शाहिद अफ्रिदी पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९६८ - सलील अंकोला क्रिकेटपटू

१९३० - राम प्रसाद गोएंका उद्योगपती

१९२२ - यित्झॅक राबिन इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान

मृत्यू :-

२००३ - गौरी देशपांडे कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री

१९९९ - दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराजकवीश्वर वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित

१९९४ - निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई 

१९८९ - वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री

१९५५ - नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती’ – धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा