नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१० नोव्हेंबर

घटना :-
२००६ - तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या

२००१ - ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड

१९९९ - शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मानगायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर

१९९० - भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

१६९८ - ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

१६५९ - शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला. त्यावेळी अफझलखान दगा ऽऽऽ दगा ऽऽऽ ...असे ओरडला.

जन्म :-

१९५२ - सुनंदा बलरामन ऊर्फ सानिया लेखिका

१९२५ - रिचर्ड बर्टन अभिनेता

१९०४ - कुसुमावती आत्माराम देशपांडे साहित्यिक व समीक्षक

१८५१ - फ्रान्सिस बाल्फोर – ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ

१८४८ - सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि जहाल गटाचे नेते

मृत्यू :-

१९९६ - माणिक वर्मा शास्त्रीय संगीत व सुगम संगीत गायिका
 
१९८२ - लिओनिद ब्रेझनेव्ह रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस

१९४१ - लक्ष्मण रामचंद्र पांगारकर संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक

१९३८ - मुस्तफा कमाल अतातुर्क तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१६५९ - अफझल खान आदिलशहाचा सेनापती
 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा