नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ नोव्हेंबर

घटना :-

१९९३ - दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

१९९२ - ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६२ - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घााटन झाले.

१९५५ - भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९३३ - प्रभातचा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्रीप्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रभातने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.

१९२८ - वॉल्ट डिस्ने- यांच्या मिकीमाऊसया प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विलीया चित्रपटाद्वारे जन्म

१९१८ - लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९०५ - लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

१८८२ - अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्रहे नाटक रंगभूमीवर आले.

१८०९ - फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

जन्म :-

१९४५ - महिंद्रा राजपक्षे श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख

१९३१ - श्रीकांत वर्मा हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक

१९१० - बटुकेश्वर दत्त क्रांतिकारक

१९०१ - व्ही. शांताराम चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते

१८९८ - प्रबोध चंद्र बागची भारताचा अतिप्राचीन इतिहास

मृत्यू :-

२००६ - काव्यतीर्थहणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु मराठी कथाकार व कवी

१९९९ - रामसिंह रतनसिंह परदेशी स्वातंत्र्यसैनिक
१९९८ - रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले समाजसेवक 

१९९६ - कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक

१९६२ - नील्स बोहर –  डॅनिश पदार्थवैज्ञानिक


१७७२ - माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरलेमाधवराव पेशवे मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा