नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ नोव्हेंबर

घटना :-

२००५ - योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००० - सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९९ - कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कारहा मानाचा पुरस्कार जाहीर

१९९४ - मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड

१९८२ - अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली. होंडा मोटार कंपनीने मेरिज्‌व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अॅंकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.

१९७३ - मैसूरराज्याचे नाव बदलुन ते कर्नाटकअसे करण्यात आले.

१९७३ - लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीपअसे ठेवण्यात आले.

१९६६ - पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

१९५६ - भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.

१९५६ - दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.

१९५६ - केरळ राज्य स्थापना दिन

१९५६ - कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

१९५३ - आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.

१९४५ - ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१८४८ - महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

१८४५ - ग्रँट मेडीकल कॉलेजहे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.

जन्म :-

१९७४ - वी. वी. एस. लक्ष्मण क्रिकेटपटू

१९७३ - ऐश्वर्या राय अभिनेत्री

१९४० - रमेश चंद्र लाहोटी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश

१९३२ - अरुण बाळकृष्ण कोलटकर मराठी व इंग्रजी कवी

१९२६ - यशवंत देव संगीतकार व गीतकार

१९२१ - शरद तळवलकर – विनोदी कलाकार

१८९३ - इंदुभूषण बॅनर्जी – बंगाली इतिहासकार

मृत्यू :-

२००५ - योगिनी जोगळेकर लेखिका

१९९६ - ज्युनिअस जयवर्धने श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष

१९९४ - कॉम्रेड दत्ता देशमुख शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते 

१९९३ - नैनोदेवी ठुमरी, दादरा व गझल गायिका 

१९९१ - अरुण पौडवाल संगीतकार व संगीत संयोजक 
१९५० - विभूतीभूषण बंदोपाध्याय जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा