नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ नोव्हेंबर

घटना :-

२०१३ - २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्नलहा भारतातील सर्वोच्चा नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

२००० - कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कारडॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

१९९७ - अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान

१९९६ - कोकण रेल्वेच्या रत्नाकगिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ

१९९६ - चतुरंग प्रतिष्ठानच्या पर्सन ऑफ प्राईडपुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड

१९८८ - अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

१९४५ - युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.


१९३० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नासगिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

१९१५ - लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.

१९१४ - अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह' सुरू झाली.

१९०७ - ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

१८९३ - डॉ. अॅकनी बेझंट यांचे भारतात आगमन

१८६८ - लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑसवरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

जन्म :-

१९७३ - पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटनपटू

१९६३ - मिनाक्षी शेषाद्री अभिनेत्री

१९३० - मिहिर सेन इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय

१९२८ - डॉ. निर्मलकुमार फडकुले   मराठी संत साहित्यातील विद्वान

१९२७ - डॉ. श्रीराम लागू –  मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार

१९१७ - चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त’ – संगीतकार

१८९४ - काव्यविहारीधोंडो वासुदेव गद्रे केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी

१८३६ - डेविड कालाकौआ हवाईचा राजा

मृत्यू :-

२००६ - मिल्टन फ्रीडमन नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ

१९६७ - रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन‘ – संगीतकार

१९६० - क्लार्क गेबल अमेरिकन अभिनेता

१९५० - डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अॅ्नॉनिमसचे एक संस्थापक

१९१५ - क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा