घटना :-
१९९५ -
पाँडेचरीमधील ’व्हेक्टर
कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील
शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’
हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट
औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
१९९५ - गझलांच्या
दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
१९४४ - दुसरे
महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या
स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
१८३९ - बॉस्टन,
मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना
जन्म :-
१९८६ - सुरेश
रैना – क्रिकेटपटू
१९४० - ब्रूस ली –
अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
१९१५ - दिगंबर
बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक
१९०७ - हरिवंशराय
बच्चणन – हिन्दी कवी
१८८१ - डॉ.
काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या
पंडित व कायदेतज्ञ
१८७४ - चेम
वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले
राष्ट्राध्यक्ष
१८७० - दत्तात्रय
बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
१८५७ - सर चार्ल्स
शेरिंग्टन – ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ
मृत्यू :-
२००८ - विश्वनाथ
प्रताप सिंग – भारताचे ७ वे
पंतप्रधान
२००० - बाळकृष्ण
दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक,
संशोधक
१९९४ - दिगंबर
विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी,
समाजवादी विचारवंत
१९७८ -
लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका
समितीच्या संस्थापिका
१९७६ - गजानन
त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि
पत्रकार
१९५२ - शंकर
रामचंद्र तथा ’अहिताग्नी’
राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते
१७५४ - अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च
गणिती
No comments:
Post a Comment