नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ नोव्हेंबर

घटना :-

२००० - उत्तराखंड उच्चट न्यायालयाची स्थापना

२००० - न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

१९९७ - साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान


१९६५ - इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्यासच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

१९६० - रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. फोर्डआडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.

१९५३ - कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४७ - भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९३७ - जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९०६ - आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

जन्म :-

१९८० - पायल रोहतगी अभिनेत्री व मॉडेल

१९३४ - कार्ल सगन अमेरिकन अंतराळतज्ञ व लेखक

१९३१ - एल. एम. सिंघवी – कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी

१९२४ - पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास ख्यालगायक, गुरु व बंदिशकार

१९०४ - पंचानन माहेश्वरी – वनस्पतीशास्त्रज्ञ

१८७७ - सर मुहम्मद इक्बाल पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते

मृत्यू :-

२०११ - हर गोविंद खुराना जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते

२००५ - के. आर. नारायणन भारताचे १० वे राष्ट्रपती

१९७७ - केशवराव भोळे गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक
१९७० - चार्ल्स द गॉल फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती

१९६७ - नटवर्य बाबूराव पेंढारकर

१९६२ - महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्न

१९५२ - चेम वाइझमॅन इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
 
१९४० - नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा