नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

५ जानेवारी

घटना :-

२००४ - संभाजी ब्रिगेडया जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

१९९८ - ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कारप्रदान करण्यात आला.

१९९७ - रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९७४ - अंटार्क्टिकामधील सर्वोच्च  तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद

१९५७ - विक्रीकर कायदा सुरू झाला.

१९४९ - पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

१९४८ - रोझ बाऊल फुटबॉलस्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्सतर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.

१९३३ - सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

१९१९ - द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

१६७१ - मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.

१६६४ - छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

जन्म :-

१९८६ - दीपिका पदुकोण कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार

१९५५ - ममता बॅनर्जी केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री

१९४८ - फैय्याज अभिनेत्री व गायिका

१९४८ - पार्थसारथी शर्मा क्रिकेटपटू

१९४१ - मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट कप्तान

१९२८ - झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान

१९२२ - मोहम्मद उमर मुक्री’ – विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते

१९०९ - श्रीपाद नारायण पेंडसे मराठी कथालेखक व कादंबरीकार

१८९२ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी लेखक व मराठी भाषातज्ञ

१८५५ - किंग कँप जिलेट अमेरिकन संशोधक व उद्योजक

१५९२  - शहाजहान ५ वा मुघल सम्राट

मृत्यू  :-

२००३ - गोपालदास पानसे पखवाजवादक  

१९९२ - दत्तात्रय गणेश गोडसे इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार

१९९० - रमेश बहल चित्रपट निर्माते व दिग्दर्शक  

१९८२ - सी. रामचंद्र संगीतकार

१९४३ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ
१९३३ - काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा