नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ जानेवारी


घटना :-

२००१ - भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

२००० - लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

१९६३ - लिओनार्डो डा व्हिन्सिच्या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

१९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

१९४७ - राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

१९४० - दुसरे महायुद्ध ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

१८८९ - संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.

१८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्चन न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

१८३५ - अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

जन्म :-

१९४२ - स्टिफन हॉकिंग इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक

१९३९ - नंदा अभिनेत्री

१९३६ - ज्योतिंद्रनाथ दिक्षीत परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

१९३५ - एल्व्हिस प्रिस्टले अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता

१९२९ - सईद जाफरी अभिनेता

१९२६ - केलुचरण महापात्रा प्रसिद्ध ओडिसी नर्तक

१९२५ - राकेश मोहन हिन्दी नाटककार

१९२४ - गीता मुखर्जी स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या

मृत्यू  :-

१९९६ - फ्रान्सवाँ मित्राँ फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष

१९९५ - मधू लिमये स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी

१९७६ - चाऊ एन लाय चीनचे राष्ट्राध्यक्ष

१९६७ - डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित

१९६६ - बिमल रॉय प्रथितयश दिग्दर्शक

१९४१ - लॉर्ड बेडन पॉवेल बालवीर चळवळीचे प्रणेते

१८८४ - केशव चंद्र सेन ब्राम्हो समाजातील  समाजसुधारक आणि लोकसेवक

१८२५ - एली व्हिटनी कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
१६४२ - गॅलेलिओ गॅलिली इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा