नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० जानेवारी

घटना :-

२००९ - अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

१९९९ - गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

१९९८ - संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कारविख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर

१९६३ - चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.

१९४८ - महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्नप झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्नस झाले होते.

१९४४ - दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.

१९३७ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.

१८४१ - ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.

१७८८ - इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यायवर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.

जन्म :-

१९६० - आपा शेर्पा १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक

१८९८ - कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार

१८७१ - सर रतनजी जमसेटजी टाटा टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति

१७७५ - आंद्रे अॅजम्पिअर फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू  :-

२००२ - रामेश्वरनाथ काओ रिसर्च अँड अॅ्नॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.

१९९३ - ऑड्रे हेपबर्न ब्रिटिश अभिनेत्री

१९८८ - खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी

१९८० - कस्तुरभाई लालभाई दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती

१९५१ - अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक

१९३६ - जॉर्ज (पाचवा) इंग्लंडचा राजा
१८९१ - डेविड कालाकौआ हवाईचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा