नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ जानेवारी

घटना :-

१९४४ - दुसरे महायुद्ध रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.

१९२९ - गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन

१९२४ - राजकारणात भाग न घेणे व रत्ना्गिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकरयांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता

१९१२ - न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.

१९०७ - मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

१८३२ - पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पणसुरू केले.

१६७३ - कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.

१६६५ - शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.

जन्म :-

१९६६ - ए. आर. रहमान संगीतकार

१९५९ - कपिल देव निखंज भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक

१९५५ - रोवान अॅ टकिन्सन विनोदी अभिनेते व पटकथालेखक

१९३१ - डॉ. आर. डी. देशपांडे पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ

१९२५ - रमेश मंत्री प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक

१८८३ - खलील जिब्रान लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार

१८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी

१८१२ - बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे पितामह

 

मृत्यू  :-

२०१० - प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक

१९८१ - ए. जे. क्रोनिन स्कॉटिश लेखक

१९७१ - प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार जादूगार

१९१९ - थिओडोर रुझव्हेल्ट अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष

१९१८ - जी. कँटर जर्मन गणितज्ञ

१८८५ - भारतेंदू हरिश्चंद्र हिन्दी साहित्यिक

१८८४ - ग्रेगोर मेंडेल जनुकांची  संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ

१८५२ - लुई ब्रेल अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक

१८४७ - त्यागराज दाक्षिणात्य संगीतकार

१७९६ - जिवबा दादा बक्षी महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी  

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा