नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१० जानेवारी

घटना :-
१९७२ - पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.

१९६६ - भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करारझाला.

१९२९ - जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अॅकडव्हेंचर्स ऑफ टिनटिनहे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

१९२६ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंदसाप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१९२० - पहिले महायुद्ध व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

१८७० - बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे  या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.

१८७० - जॉन डी. रॉकफेलर याने स्टँडर्ड ऑईलकंपनीची स्थापना केली.

१८६३ - चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

१८१० - नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्नीऑला घटस्फोट दिला.

१८०६ - केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

१७३० - पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

१६६६ - सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.

जन्म :-

१९७४ - हृतिक रोशन सिनेकलाकार

१९४० - के. जे. येसूदास पार्श्वगायक व संगीतकार

१९०१ - डॉ. गणेश हरी खरे - इतिहास संशोधक

१९०० - मारोतराव सांबशिव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री

१८९६ - नरहर विष्णू तथा काकासाहेबगाडगीळ स्वातंत्र्यसैनिक, लेखक, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री

१७७५ - बाजीराव पेशवे (दुसरे)

मृत्यू  :-

२००२ - पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास ख्यालगायक, गुरु व बंदिशकार

१९९९ - आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत  

१७७८ - कार्ल लिनिअस स्वीडीश वनस्पतीतज्ञ
१७६० - दत्ताजी शिंदे पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा