नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ जानेवारी

घटना :-

२००० - ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
 
१९३२ - डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
 
१९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
 
१९०८ - संगीतसूर्यकेशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्शही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
 
१९०० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
 
१८९९ - क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
 
१८८३ - पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
 
१८८० - विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
 
१८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
 
१८४८ - महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
 
१८४२ - बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदयवृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
 
१८०८ - यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
 
१७५६ - निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्कअसे नाव देण्यात आले.
 

जन्म :-

१९५१ - नाना पाटेकर अभिनेता

१९५० - दीपा मेहता भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका

१९४३ - रघुनाथ माशेलकर शास्त्रज्ञ, वैज्ञानिक

१९४१ - गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी’ – चित्रपट कलाकार

१९३६ - राजा राजवाडे साहित्यिक

१९२८ - डॉ. मधुकर आष्टीकर लेखक

१९२३ - उमा देवी खत्री उर्फ टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका

१९१८ - शांताबाई दाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

१९०२ - कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान - वैज्ञानिक

१९०० - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक

१८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१८९२ - महादेव देसाई स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक

१८७९ - इ. एम. फोर्स्टर ब्रिटिश साहित्यिक

१६६२ - बाळाजी विश्वनाथ भट - पहिला पेशवा


मृत्यू  :-


२००९ - रामाश्रेय झा संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीत विद्वान

१९८९ - दिनकर साक्रीकर समाजवादी विचारवंत व पत्रकार

१९७५ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर उद्योजक, साहित्यिक व चित्रकार

१९५५ - डॉ. शांतिस्वरुप भटनागर वैज्ञानिक

१९४४ - सर एडविन लुटेन्स दिल्लीचे नगररचनाकार

१८९४ - हेन्‍रिच हर्ट्‌झ जर्मन भौतिकशास्त्रज्ञ 

१७४८ - योहान बर्नोली स्विस गणितज्ञ

१५१५ - लुई (बारावा) फ्रान्सचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा