नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ जानेवारी


घटना :-

२०१० - बुर्ज खलिफाया जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घा्टन झाले.

१९९६ - साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंबया कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

१९५९ - लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.

१९५८ - १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.

१९५४ - मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५२ - ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.

१९४८ - ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४४ - १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.

१९३२ - सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा

१९२६ - क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.

१८८५ - आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.

१८८१ - लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे केसरीया वृत्तपत्राची सुरूवात केली.

१६४१ - कर भरायला नकार देणार्याे लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

जन्म :-

१९२४ - विद्याधर गोखले नाटककार व संपादक

१९१४ - इंदिरा संत  कवयित्री व लेखिका

१८१३ - सर आयझॅक पिटमॅन शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक

१८०९ - लुई ब्रेल अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक

मृत्यू  :-

१९९४ - राहूलदेव बर्मन तथा पंचमदा’ – संगीतकार

१९६५ - टी. एस. इलियट अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार

१९६१ - आयर्विन श्रॉडिंगर ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ

१९०८ - राजारामशास्त्री भागवत विद्वान व समाजसुधारक

१९०७ - गोवर्धनराम त्रिपाठी गुजराथी लेखक
१७५२ - गॅब्रिअल क्रॅमर स्विस गणिती

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा