नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ जानेवारी

घटना :-
२००० - संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२००० - पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
१९९८ - डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
१९८९ - मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
१९५४ - राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी भारतरत्नदपुरस्कारांची स्थापना केली.
१९४५ - दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९४२ - दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
१९३६ - मध्य प्रदेश उच्च. न्यायालयाची स्थापना
१९०५ - मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
१८८५ - पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
१८८१ - लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठाया दैनिकाची सुरूवात झाली.
१७५७ - प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
जन्म :-
१९६० - रमण लांबा क्रिकेटपटू
१९५९ - किर्ती आझाद क्रिकेटपटू
१९३२ - हरचंदसिंग लोंगोवाल अकाली दलाचे अध्यक्ष
१९२० - आयझॅक असिमॉव्ह अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
मृत्यू  :-
२००२ - अनिल अग्रवाल पर्यावरणवादी
१९९९ - विमला फारुकी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
१९८९ - सफदर हश्मी लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
१९४४ - महर्षि विठ्ठल रामजी शिंदे  समाजसुधारक
१९३५ - मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर स्वातंत्र्यसैनिक
१३१६ - अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा