नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२२ जानेवारी

घटना :-

२००१ - आय. एन. एस. मुंबईही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.

१९९९ - ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

१९७१ - सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४७ - भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर

१९२४ - रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

१९०१ - राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

जन्म :-

१९३४ - विजय आनंद हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९२० - प्रा. ह. श्री. शेणोलीकर संतसाहित्याचे अभ्यासक

१९१६ - सत्येन बोस बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक

१९१६ - हरिलाल उपाध्याय गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी

१९०९ - यू. थांट संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस

१५६१ - सर फ्रँन्सिस बेकन इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी

मृत्यू  :-

१९७८ - हर्बर्ट सटक्लिफ इंग्लिश क्रिकेटपटू

१९७५ - काव्यविहारीधोंडो वासुदेव गद्रे केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी

१९७३ - लिंडन बी. जॉन्सन अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष

१९७२ - स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ

१९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार

१९०१ - व्हिक्टोरिया इंग्लंडची राणी

१७९९ - होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक

१६८२ - समर्थ रामदास स्वामी

१६६६ - मुघल सम्राट शहाजहान
१२९७ - योगी चांगदेव समाधिस्थ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा