नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२४ जानेवारी

घटना :-

१९८४ - अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

१९७६ - बर्मा शेलया ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीजअसे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.

१९७२ - गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

१९६६ - भारताच्या तिसर्या  पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

१९६६ - एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

१९४३ - पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार

१९४२ - दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

१९१६ - नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्चल न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

१९०१ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१८६२ - बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

१८५७ - दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

१८४८ - कॅलिफोर्निया गोल्डरश कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.

जन्म :-

१९४३ - सुभाष घई हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक

१९२४ - मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष

१९२४ - रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री

मृत्यू  :-

२०११ - स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी शास्त्रीय गायक

२००५ - अनुताई लिमये गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र स्वातंत्र्यसेनानी सामाजिक कार्यकर्त्या  

१९६६ - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा
१९६५ - विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा