नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ जानेवारी

घटना :-

२००५ - एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.

१९९९ - नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्नरहा सर्वोच्च२ नागरी सन्मान जाहीर.

१९९८ - मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९७ - नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.

१९७४ - इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

१९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार

१९११ - युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

१७७८ - कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.

जन्म :-

१९७२ - विनोद कांबळी भारतीय क्रिकेटपटू

१९६६ - अलेक्झांडर खलिफमान रशियन बुद्धिबळपटू

१९५२ - वीरप्पन चंदन तस्कर

१९३३ - जगदीश शरण वर्मा भारताचे २७ वे सरन्यायाधीश

१८८९ - शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर’ – नाट्यछटाकार

१८८९ - देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. कन्नड कवी व विचारवंत

१८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश

१७९३ - राजे प्रतापसिंह भोसले - छत्रपती शाहू (दुसरे) यांचे थोरले चिरंजीव

मृत्यू  :-

२००३ - हरिवंशराय बच्चयन हिन्दी कवी

१९९६ - एन. टी. रामाराव तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री

१८९३ - आत्माराम रावजी भट कृतिशील विचारवंत

१९४७ - कुंदनलान सैगल गायक व अभिनेते
१९३६ - रुडयार्ड किपलिंग नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा