नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१५ जानेवारी


घटना :-

२००१ - सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडियाहा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

१९९९ - गायिका ज्योत्स्नाे भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९६ - भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

१९७३ - जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

१९७० - मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९४९ - जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१८८९ - द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

१८६१ - एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१७६१ - पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१५५९ - राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅ बे येथे राज्याभिषेक झाला.

जन्म :-

१९२९ - मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते

१९२६ - कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय

१९२१ - बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री

१९२० - डॉ. आर. सी. हिरेमठ कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू

१७७९ - रॉबर्ट ग्रँट मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो.

मृत्यू  :-

२०१४ - नामदेव लक्ष्मण ढसाळ दलित साहित्यिक

२०१३ - डॉ. शरदचंद्र गोखले समाजसेवक

२००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत

१९९८ - गुलजारीलाल नंदा भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते

१९९४ - हरिलाल उपाध्याय गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी
१९७१ - दीनानाथ दलाल अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा