नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ जानेवारी

घटना :-

२००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण

१९९८ - ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कारजाहीर

१९९६ - पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड

१९९५ - आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.

१९७९ - शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.

१९७८ - रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द

१९५५ - पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न

१९४१ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण

१९२० - अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.

१९१९ - अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.

१६८१ - छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपतीम्हणून राज्याभिषेक झाला.

१६६६ - नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला

१६६० - रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.

जन्म :-

१९४६ - कबीर बेदी चित्रपट अभिनेते

१९२६ - ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर संगीतकार

१९२० - नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानीपालखीवाला कायदेपंडित आणि अर्थतज्ञ

१८५३ - आंद्रे मिचेलिन फ्रेन्च उद्योगपती

मृत्यू  :-

२००५ - श्रीकृष्ण हरी मेहेंदळे संगीतकार   

२००३ - रामविलास जगन्नाथ राठी सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक  

२००० - त्रिलोकीनाथ कौल मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत

१९९७ - डॉ. दत्ता सामंत -  कामगार नेते

१९८८ - डॉ. लक्ष्मीकांत झा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ

१९६७ - रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

१९६६ - साधू वासवानी आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ

१९५४ - बाबूराव पेंटर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी

१९३८ - शरदचंद्र चट्टोपाध्याय बंगाली साहित्यिक
१९०९ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा