नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१ डिसेंबर

घटना :-

२००१ - ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.

१९९९ - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियमम्हणून मानांकित करण्यात आले.

१९९३ - प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवीजाहीर

१९९२ - कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कारगायिका आशा भोसले यांना जाहीर

१९९२ - ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चां क प्रस्थापित केला.

१९८८ - बेनझीर भूट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली.

१९८१ - AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

१९७६ - अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७३ - पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६५ - भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना

१९६४ - मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९६३ - नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.

१९४८ - एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचारही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

१९१७ - कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

जन्म :-

१९८० - मोहम्मद कैफ भारतीय क्रिकेटपटू

१९६३ - अर्जुना रणतुंगा श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक

१९५५ - उदित नारायण पार्श्वगायक

१९०९ - बा. सी. मर्ढेकर मराठी नवकाव्याचे प्रणेते

१८८५ - आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेबकालेलकर देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, सखोल चिंतक

१७६१ - मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका

१०८१ - लुई (सहावा) फ्रान्सचा राजा

मृत्यू :-

१९९० - विजयालक्ष्मी पंडीत राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी

१९८८ - गंगाधर बाळकृष्ण तथा गं. बा.सरदार विचारवंत व साहित्यिक

१९८५ - शंकर त्रिंबक तथा दादाधर्माधिकारी स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
११३५ - हेन्री (पहिला) इंग्लंडचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा