नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२४ डिसेंबर

घटना :-
१९९९ - काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्या( इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

१९७९ - सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

१९५१ - लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.

१९४३ - दुसरे महायुद्ध जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.

१९२४ - अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९१० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा

१९०६ - रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

१७७७ - कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

जन्म :-

१९५९ - अनिल कपूर हिन्दी चित्रपट कलाकार

१९५७ - हमीद करझाई अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष

१९२४ - मोहम्मद रफी पार्श्वगायक

१८९९ - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक

१८८० - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते

१८६४ - विश्वनाथ कार ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक

१८१८ - जेम्स प्रेस्कॉट ज्यूल  ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक

११६६ - जॉन इंग्लंडचा राजा

मृत्यू :-

२००५ - भानुमती रामकृष्ण तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका

१९८७ - एम. जी. रामचंद्रन अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री

१९७७ - नलिनीबाला देवी आसामी कवयित्री व लेखिका

१९७३ - पेरीयार ई. व्ही. रामस्वामी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
१५२४ - वास्को द गामा पोर्तुगीज दर्यावर्दी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा