घटना :-
१९९१ - मिखाईल
गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत
संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा
देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.
१९९० - वर्ल्ड
वाइड वेबची (www) पहिली यशस्वी
चाचणी
१९७६ - ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
जन्म :-
१९४९ - नवाझ शरीफ
– पाकिस्तानचे १२ वे
पंतप्रधान
१९३२ - प्रभाकर जोग
– व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
१९२७ - पं.
रामनारायण – सुप्रसिद्ध
सारंगीये
१९२६ - डॉ.
धर्मवीर भारती – हिन्दी लेखक,
कवी, नाटककार, पत्रकार
१९२४ - अटलबिहारी
बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान,
भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी
१९१९ - नौशाद अली
– संगीतकार
१९१८ - अन्वर
सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष
व नोबेल पारितोषिक विजेते
१९११ - बर्न
होगार्थ – अमेरिकन
व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
१८७६ - बॅ.
मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे
प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल
१८६१ - पण्डित
मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू
विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
१६४२ - सर आयझॅक
न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,
गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
मृत्यू :-
१९९८ - दत्तात्रय
गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व
दिग्दर्शक
१९९५ - डीन
मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
१९९४ - ग्यानी
झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती,
पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री
१९७७ - चार्ली
चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार
१९७२ - चक्रवर्ती
राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे
गव्हर्नर जनरल, स्वातंत्र्यसेनानी,
कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
१९५७ - प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत
व समाजसुधारक
No comments:
Post a Comment