नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२७ डिसेंबर

घटना :-

१९७५ - बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.

१९४९ - इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९४५ - २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.

१९११ - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मनहे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी१९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

जन्म :-

१९४४ - विजय अरोरा हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता

१८९८ - डॉ. पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री

१८२२ - लुई पाश्चर फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

१७९७ - मिर्झा गालिब उर्दू शायर

१६५४ - जेकब बर्नोली स्विस गणितज्ञ

१५७१ - योहान केपलर जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२००७ - बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या पंतप्रधान

१९७२ - लेस्टर बी. पिअर्सन कॅनडाचे १४ वे पंतप्रधान
१९२३ - गुस्ताव्ह आयफेल फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा