नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ डिसेंबर

घटना :-

२००१ - एन्रॉ्न कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

१९९९ - काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

१९८९ - भारताचे ७ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

१९८८ - बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्याभ त्या पहिल्या महिला होत.

१९७६ - फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

१९७१ - अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्वैपन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

१९४२ - योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.



१९४२ - एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.

१४०२ - लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.



जन्म :-

१९५९ - बोम्मन ईराणी अभिनेता

१९४७ - धीरज परसाना क्रिकेटपटू

१९३७ - मनोहर जोशी लोकसभेचे सभापती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९१३ - दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक

१९०५ - अनंत काणेकर चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्रीसोविएत लँड नेहरू पुरस्कारविजेते

१८९८ - इन्दर लाल रॉय पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट

१८५५ - सर नारायण गणेश चंदावरकर कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२)

मृत्यू :-

१९९६ - एम. चेन्नाण रेड्डी आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री

१९८० - चौधरी मुहम्मद अली पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान

१९०६ - बाळाजी प्रभाकर मोडक विज्ञानप्रसारक, लेखक
१५९४ - गेरहार्ट मरकेटर नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा