नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२३ डिसेंबर

घटना :-

२००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

२००० - कलकत्ता शहराचे नाव कोलकताअसे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

१९७० - धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राटया नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

१९५४ - डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.

१९५४ - बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४७ - अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्जया संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टरया उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्याम मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.

१९४० - वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्टहा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

१९२१ - शांतिनिकेतन येथे विश्व भारतीविश्वविद्यालयाची स्थापना.

१९१४ - पहिले विश्वयुद्ध ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.

१८९३ - हॅन्सेल अॅंधड ग्रेटेलया प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.

जन्म :-

१९०२ - चौधरी चरण सिंग भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदलपक्षाचे संस्थापक

१८९७ - कविचंद्र कालिचरण पटनाईक ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार

१८५४ - हेन्री् बी. गुप्पी ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२०१० - के. करुणाकरन केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री

२०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी कला समीक्षक व लेखक

२००८ - गंगाधर महांबरे गीतकार कवी व लेखक

२००४ - नरसिंह राव भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री

१९९८ - रत्नालप्पा कुंभार स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य

१९७९ - दत्ता कोरगावकर हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार

१९६५ - गणेश गोविंद तथा गणपतरावबोडस नट व गायक
१८३४ - थॉमस माल्थस प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा