नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२८ डिसेंबर

घटना :-

१८९५ - ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.   

१८८५ - मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना

१८४६ - आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.

१८३६ - स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१६१२ - गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.

जन्म :-

१९५२ - अरुण जेटली केंद्रीय मंत्री व वकील

१९४५ - वीरेंद्र नेपाळचे राजे

१९४० - ए. के. अँटनी भारताचे परराष्ट्रमंत्री

१९३७ - रतन टाटा उद्योगपती

१९३२ - धीरुभाई अंबानी उद्योगपती

१९२६ - हुतात्मा शिरीषकुमार

१८९९ - गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार

१८५६ - वूड्रो विल्सन अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते

मृत्यू :-

२००६ - प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायोलिनवादक

२००० - मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे तत्त्वचिंतक

१९७७ - सुमित्रानंदन पंत छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी

१९३१ - आबालाल रहमान चित्रकार
१६६३ - फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा