नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ मार्च

घटना :-

२०१० - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते 'लोकसंस्कृती'चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' पुण्यात देण्यात आला.

२००१ - चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत.

२००१ - व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च  धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२००० - कलकत्ता येथील टेक्निहशियन आयहा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

१९५४ - दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१९३१ - आलम आराहा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

जन्म :-

१९७४ - साधना घाणेकर ऊर्फ साधना सरगम’ – पार्श्वगायिका

१९३३ - मायकेल केन ब्रिटिश अभिनेता

१९३१ - प्रभाकर पणशीकर ख्यातनाम अभिनेते

१८७९ - अल्बर्ट आइनस्टाईन नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ

मृत्यू :-

२०१० - गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार

२००३ - कवी सुरेश भट

१९९८ - दादा कोंडके अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक
१९३२ - जॉर्ज इस्टमन अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
 
१८८३ - कार्ल मार्क्स जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा