नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२६ मार्च

घटना :-

२०१३ - त्रिपूरा उच्चघ न्यायालयाची स्थापना

२००० - ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

१९७९ - अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या

१९७४ - गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपकोआंदोलनाची सुरूवात.

१९७२ - नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९४२ - इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह

१९४२ - ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

१९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.

१९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.

१५५२ - गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

जन्म :-

१९८५ - प्रॉस्पर उत्सेया झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू

१९०९ - बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतकचे पहिले संपादक

१९०७ - महादेवी वर्मा हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामाया काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

१८७५ - सिंगमन र्हीम दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१८७४ - रॉबर्ट फ्रॉस्ट अमेरिकन कवी

मृत्यू :-

२०१२ - माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी

२००८ - बाबुराव बागूल दलित साहित्यिक

२००३ - गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या

१९९९ - आनंद शंकर प्रयोगशील संगीतकार

१९९७ - नवलमल फिरोदिया गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती

१९९६ - के. के. हेब्बर चित्रकार

१९९६ - डेव्हिड पॅकार्ड ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक
१८२७ - लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा