नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ मार्च

घटना :-

२००० - फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

१९९० - नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९८० - अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

१९७७ - भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९३५ - शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

१८७१ - ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

१८५८ - इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.

१६८० - शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.

१५५६ - ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्याय आर्चबिशप थॉमस क्रॅनमरला शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

जन्म :-

१९७८ - राणी मुखर्जी अभिनेत्री

१९१६ - बिस्मिला खाँ शहनाई नवाझ

१८८७ - मानवेंद्रनाथ रॉय देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक

१८४७ - बाळाजी प्रभाकर मोडक –  विज्ञानप्रसारक, लेखक

१७६८ - जोसेफ फोरियर फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२०१० - पांडुरंग लक्ष्मण तथा बाळगाडगीळ अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक

२००५ - दिनकर द. पाटील चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक

१९८५ - सर मायकेल रेडग्रेव्ह ब्रिटिश अभिनेता

१९७३ - यशवंत रामकृष्ण दाते कोशकार
१९७३ - नटवर्य शंकर घाणेकर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा