नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

५ मार्च

घटना :-

२००० - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण

१९९९ - इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे देण्यात येणार्याव आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड

१९९८ - नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्याड, रशियाकडुन घेतलेल्या सिंधुरक्षकया पाणबुडीचे मुंबई येथे आगमन

१९९७ - ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या  टपाल तिकिटाचे प्रकाशन

१९६६ - मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत

१९३३ - भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

१९३१ - दुसर्यां गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.

१६६६ - शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.

१८५१ - जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची (GSI) स्थापना

१५५८ - फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.

जन्म :-

१९१६ - बिजू पटनायक ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री

१९१३ - गंगूबाई हनगळ किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका

१९०८ - सर रेक्स हॅरिसन ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते

१८९८ - चाऊ एन लाय चीनचे राष्ट्राध्यक्ष

१५१२ - गेरहार्ट मरकेटर नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ

मृत्यू :-

२०१३ - ह्युगो चावेझ व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष

१९९५ - जलाल आगा चरित्र अभिनेता

१९८९ - बाबा पृथ्वीसिंह आज़ाद क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक

१९८५ - पु. ग. सहस्रबुद्धे – ’महाराष्ट्र संस्कृतीकार

१९६८ - नारायण गोविंद चाफेकर समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार

१९६६ - शंकरराव मोरे समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते

१९५३ - जोसेफ स्टालिन सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
१८२७ - अलासांड्रो व्होल्टा इटालियन भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा